TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रमाची यशस्विता ; विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ !

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपूण‌ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात १० ते २० ऑक्टोंबर या कालावधीत इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलां-मुलींसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार ७११ शाळांमधील १ लाख ७४ हजार ४४१ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यात कमालीचा यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ झाली आहे. पूर्वीपेक्षा ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात प्राविण्य मिळवले आहे.

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आराखडा तयार करुन जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना अंमलबजावणीचे आदेश दिले. विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भिती दूर करणे, गणिताचे कौशल्यात सुधार करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला. यामुळे गणित विषयाच्या नियमित पाठ्यक्रमाचे लवकर आकलन करण्यात विद्यार्थ्यांना मदत झाली. या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी काम पाहिले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

‘दहा दिवस गणितासाठी’ या उपक्रमात गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, बेरीज , वजाबाकी, गुणाकार व भागाकार या सहा क्षमतेवर तालुकानिहाय गुणांकन करण्यात आले‌. सर्व तालुक्यांचे एकत्रित आकडेवारीच्या सरासरीतून जिल्ह्याचा एकूण गुणांकन करण्यात आले.’दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गणितीय पायाभूत आकलन क्षमता ५२ टक्के होती‌. उपक्रमांची २० ऑक्टोंबर रोजी सांगता झाल्यानंतर पायाभूत आकलन क्षमता ७२ टक्के झाली. या आकलन क्षमतेत २० टक्के वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांना सराव तसेच इतर कृती पध्दतीचा वापर करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याचा वापर करून गणित रंजक पद्धतीने शिकविण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिक्षकांना त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पूरक अधिकच्या कृतींचे आयोजन करता येण्याची मुभा देण्यात आली होती. याचा जिल्ह्यातील काही उपक्रमशील शिक्षकांनी चांगला वापर करत विद्यार्थ्यांना गणित हसत-खेळत शिकविले. या उपक्रमात आनंददायी कृतींचा, गणितीय खेळांचा, परिसरात व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन होईल. अशा कृतीद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण झाली. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत वाढ झाली.

या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे दररोज सायंकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेत होते. शिक्षण विभागाच्या व डायट मधील सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन किमान २ शाळांना भेटी दिल्या. शिक्षकांनी परिश्रमपूर्वक विद्यार्थ्यांना शिकविले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी ही तितकेच मन लावून गणिताचे आकलन केले. या उपक्रमाच्या यशाबद्दल जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

चाळीसगावची आक्काबाई स्थानबद्ध ; अकोला कारागृहात रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत’ ; आर्यन खानच्या ‘या’ मित्राचा खळबळजनक आरोप

October 7, 2021

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

April 30, 2021

मोठी बातमी : द्वेषपूर्ण भाषणांवर तक्रारी आल्या नाहीत तरी गुन्हे नोंदवा ; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश !

April 28, 2023

भारतीयांनो सावधान : कोरोना विषाणूची नवीन लाट, ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाउन !

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group