चंद्रपूर (वृत्तसंस्था) भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. मुनगंटीवारासह त्यांच्या पत्नीनेही कोरोना लस घेतली आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मुनगंटीवारांनी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला. दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली. तसेच याआधी राज्यातील अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. राज्यातील कोरोना लसीकरण मोहीम आता वेगवान झाली आहे. त्यामुळे या लसीविषयक गैरसमज काढून टाका, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सरकारने एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर करून प्रायश्चित्त घेतल्याची प्रतिक्रिया दिली. कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणे हे राज्य सरकारचे नवीन धोरण केले होते. राज्य सरकारची हुकूमशाही मार्गाने चालवली जाणारी लोकशाही सामान्यजनांसाठी घातक असल्याची टीकाही मुनगंटीवारांनी केली.