जळगाव (प्रतिनिधी) उन्हाळी सुट्ट्या मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असा समर कॅम्प अमन फाउंडेशनतर्फे 15 मे 2022 ते 2 जून 2022 मिल्लत प्रायमरी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. व सदर समर कॅम्प च्या निरोप समारंभ दिनांक 2 जून रोजी सायंकाळी मिल्लत प्रायमरी स्कूल च्या मैदाना वर घेण्यात आला.
सदर कॅम्प मध्ये मुले मुली मिळून एकूण 71 विद्यार्थी सहभागी झाले होते सदर विद्यार्थ्यांना फुटबॉल, चेस, घोडेस्वारी, आर्चरी, स्विमिंग, कुस्ती, सेल्फ डिफेन्स इत्यादी विविध खेळांचा आनंद लुटला. तसेच विद्यार्थ्यांचे व्यवसायिक वृत्तीला वाव मिळविण्यासाठी त्यांचे गट पाडून त्यांना काही रक्कम व्यवसाय करण्यासाठी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपसात विचार करून प्रत्येक गटाने स्थानिक बाजारात स्टॉल लावून वेगवेगळे व्यवसाय सुरू केला व त्यांना आपापल्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा आला. सदर कॅम्प मध्ये सय्यद अल्ताफ अली सर व डॉक्टर रागिब जागीरदार यांनी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले.
सदर कॅम्पच्या शेवटचा भाग म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ मिल्लत प्रायमरी शाळेच्या मैदानात 2 जून रोजी सायंकाळी घेण्यात आला. सत्कार समारंभांमध्ये ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वाहाब मलिक, मुक्ती अतीक उर रहमान, डॉ. रागिब जागीरदार, सय्यद अल्ताफ अली, नगरसेवक रियाज बागवान उपस्थित होते. तसेच अध्यक्षस्थानी मजीद झाकरिया होते. सदर समारंभात कॅम्प मध्ये घेण्यात आलेले विविध स्पर्धात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मिर्जा यांनी केले. प्रस्तावना उनेस पटेल यांनी मांडली. तसेच सर्वांचे आभार अमन फाऊंडेशनचे अध्यक्ष रेहान खाटीक यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अदनान बागवान, मलिक सकलेन, शाहिद खान, अरीश शेख व इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले.