धुळे (प्रतिनिधी) धुळ्याचे नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पदभार घेतल्यानंतर धुळ्यासह जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचे सुतोवाच केले होते व शुक्रवारी स्वतः पोलिस अधीक्षकांनी आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका क्लबवरील कारवाईत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 17 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील सुमारे 20 विक्रेत्यांवर चोरीचे भंगार साहित्य घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नूतन धुळे पोलिस अधीक्षक धीवरे यांनी दिली.
वॉश आऊट मोहिमेने खळबळ
धुळे जिल्ह्यात अवैध धंद्याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलिस प्रशासन वॉश आऊट मोहिम राबवणार असल्याचे सुतोवाच नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पदभार घेताना केले होते. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्षात कृतीवरही भर दिला असून शुक्रवारी दिवसभरात शहरातील विविध भागात छापेमारी करीत अवैध धंदे चालकांविरोधात कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली.
बंद राजकमल टॉकीत जुगाराचा डाव उधळला
धुळे शहरातील बंद राजकमल टॉकीज येथे असलेल्या एका खोलीत लोकेश शालिग्राम सूर्यवंशी व अशोक यशवंत तायडे हे 52 पत्त्यांच्या कॅटवर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हारजितचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर नूतन पोलिस अधीक्षकांनी छापेमारी केली. रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, मोबाईल, तसेच मोटार सायकली मिळून 17 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
12 जुगारींना अटक ः एक संशयित पसार
लोकेश शालिग्राम सूर्यवंशी (जुने धुळे) हा संशयित पसार झाला असून पोलिसांनी अशोक यशवंत तायडे (45, रा.मनोहर टाकिज मागे, धुळे), सुरज भगवान पवार (36, रा.वाणी मंगल कार्यालयाचे समोर चितोड रोड, धुळे), स्वप्नील प्रभाकर साळवे (34 रा.वैभव नगर, गोळीबार टेकडीजवळ, धुळे), जितेंद्र वामन गोपाळ (27, रा.भाईजी नगर, नवनाथ मंदिराजवळ धुळे), नरेंद्र अशोक ईखे (37, रा.शेलारवाडी चितोड रोड, धुळे), धनेंद्र लक्ष्मण जाधव (40, रा.खेडे, ता.जि.धुळे), जयदीप दयाराम चत्रे (38, रा.श्रीराम मंगल कार्यालयासमोर, ग.नं.9 देवपूर, धुळे), दुर्गेश संजय लोखंडे (28, रा.32 क्वार्टर्स सिव्हील हॉस्पीटल कॉलनी, धुळे), बापू हरचंद तमखाने (69, रा.मच्छीबाजार, मोगलाई साक्रीरोड, धुळे), हरेश दिलीप शिंदे (36, रा.स्वामी दयानंद सोसायटी, साक्री रोड, धुळे), मुन्ना इब्राहीम शेख (49, रा.ग.नं.4, एकनाथ व्यायम शाळेचे पाठीमागे, धुळे), संजय आधार गर्दे (42, रा.50 खोली, शांतीनगर, जयहिंद मंदिर मागे, अभय कॉलेज मागे, धुळे) यांच्याविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 4,5 प्रमाणे आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, अमरजित मोरे, प्रकाश पाटील, शाम निकम, दिलीप खोंडे, मच्छींद्र पाटील, हवालदार रवींद्र माळी, हवालदार संदीप पाटील, हवालदार प्रकाश सोनार, हवालदार सुरेश भालेराव, नाईक रवीकिरण राठोड, नाईक प्रशांत चौधरी, नाईक मायुस सोनवणे, नाईक प्रल्हाद वाघ, कॉन्स्टेबल निलेश पोतदार, कॉन्स्टेबल राहुल गिरी, कॉन्स्टेबल गुणवंत पाटील, कॉन्स्टेबल किशोर पाटील, कॉन्स्टेबल योगेश साळवे, कॉन्स्टेबल देवेंद्र ठाकुर, कॉन्स्टेबल सुशील शेंडे आदींच्या पथकाने केली.
भंगार विक्रेत्यांवर कारवाई
शुक्रवारी सायंकाळी मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील चाळीसगाव चौफुलीवर भंगार बाजारात पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी सुमारे 15 ते 20 विक्रेत्यांकडील भंगार साहित्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली. मोहाडीचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.