चोपडा (प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिराचे इ.5 व 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत (23-24) प्रतापच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकाविला आहे. येथिल सुराणा मेडिकलचे संचालक प्रकाश सुराणा (लासुरकर) यांचा नातू तर पद्मावती कलेक्शनचे निर्मल सुगणचंद बोरा यांचा भाचा आयुष राकेश सुराणा याला 61; 90℅ गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.
प्रताप विद्या मंदिरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच जिल्हा गुणवंत यादीत k.89 नंबर पटकावला आहे. तसेच जवाहर फाऊंडेशन पुणेतर्फे घेण्यात येणाऱ्या (GTS) या परीक्षेत सुध्दा 97% गुण मिळवुन 5 वी 6 वीत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. त्याच्या या दोघं यशाबद्दल तालुक्याभारतातून जैन समाजाच्या वतीने अनेकांनी कौतुक केले आहे. संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, यांच्या हस्ते व संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात पालकांसह कौतूक व अभिनंदन करण्यात आले.