मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे, आरोपी लवकरच गजाआड जाईल. त्याला कुणी मारले आणि दिशाचा बलात्कार कोणी केला? तिच्या अंगावरील जखमा या वरुन खाली पडल्यामुळे झालेल्या नाहीत.दिशाला खाली कोणी टाकले हे सर्व बाहेर येईल आणि लवकरच एक मंत्री गजाआड जाईल आणि तो मुख्यमंत्र्यांचा पुत्र असेल, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे व त्यांच्या पुत्रांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. राणे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करून मुलाला वाचवत आहे. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कोणी केली. तिच्या अंगावरील जखमा या वरुन खाली पडल्यामुळं झालेल्या नाहीत. तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेले नाही. इतरांच्या मदतीने कामं केली. मुख्यमंत्री स्वतःच स्वतःच्या मुलाला क्लीन चीट देत आहेत. पण, सुशांतच्या खुनाच्या प्रयत्नात एक मंत्री आतमध्ये जाईल आणि तो ह्यांचा मुलगा असेल,’ असा दावा नारायण राणे यांनी केला. त्याचबरोबर, सीबीआयने अद्याप ही केस बंद केलेली नाही त्यामुळे भ्रमात राहू नका. माझ्याकडेही पोस्टमार्टमचे अहवाल आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. किती पोलिसांचा वापर करणार, स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांचा वापर केला. लवकरच, सुशांतचे गुन्हेगार बाहेर येतील. त्याचबरोबर, दिशावर बलात्कार कोणी केला. या प्रकरणाचाही गुंता सुटेल, असे ही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. मोदींच्या जीवावर निवडणूक लढवली म्हणून ५६ आमदार तरी आले पुढच्या वेळी तेवढेपण येणार नाहीत. दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर यापुढे माझ्यावर किंवा माझ्या मुलांवर टीका केली किंवा भाजपावर टीका केली तर तशाच भाषेत उत्तर दिले जाईल. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे म्हणून मी गप्प बसलो आहे. जर मातोश्रीच्या आत काय काय चालते ते सांगितले ना तर कपडे घेऊन पळत फिरावे लागेल असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्यावेळी राणे पितापुत्रांचा उल्लेख बेडुक असा केला होता. बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला असं उल्लेख त्यांनी करत नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार नारायण राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला.
















