नागपूर (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने जगासमोर आव्हान उभे राहिले आहे. नवा विषाणू किती प्रभावी आहे यावर संशोधन सुरू असताना नागपूरमध्ये इंग्लंडहून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे.
इंग्लंडमध्ये कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाची अनेकांना लागण झालीय. यामुळे या तरूणाला नवा कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण नवीन कोरोना बाधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राचे धाबे दणाणले आहेत. दक्षिण व पूर्व इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन करोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नवीन कोरोना संशयित असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तरुणावर मेडिकलमध्ये उपचार सुरु असून पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तरूणाचे तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंब सदस्यांसह इतर काही जणही कोरोनाबाधित झाल्याची माहिती मिळाली आहे.
















