जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाथरी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माहेरच्या मंडळींनी घातापाताचा संशय व्यक्त केला आहे. शीतल दीपकसिंग पाटील (वय २८), असे मयत विवाहितेचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील पाथरी येथे शीतल पाटील या विवाहितेचा मृत्यू झाल्याने तिला शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री तिच्या पतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले होते. शनिवारी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या मंडळीनी केला. सासरी तिचा छळ केला जात असल्याचे माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे. मयत विवाहितेचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.