जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरी विठ्ठल नगर येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा पडून तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घातपाताचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. कृष्णा सुधीर अहिरे (वय-20, रा. हरी विठ्ठल नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
कृष्णा अहिरे हा मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. आज रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजमालती नगरातील संस्कृती अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कृष्णा अहिरे याने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात केल्याचा आरोप त्याचे वडील सुधीर अहिरे यांनी केला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. मयत कृष्णा अहिरे हा वडील सुधीर अहिरे, आई अनिता अहिरे आणि भाऊ चेतन अहिरे यांच्यासह हरी विठ्ठल नगर असा परिवार आहे.