जळगाव (प्रतिनिधी) दिनांक २८ ते ३० सप्टेंबर रोजी लातूर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होते. २८ जिल्ह्यातील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा (Jain sports academy) संघ सहभागी झाला होता. यामध्ये पुरुषांच्या ७४ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सलग चौथ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर ५८ किलो गटात यश शिंदे याने कांस्यपदक पटकावले. महिलांच्या ५२ किलो आतील वजन गटात पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांनी कांस्यपदक पटकावले. त्यांना मुख्य प्रशिक्षक जयेश बाविस्कर याचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. १७ ते २० ऑक्टोबर रोजी पाॅडेंचेरी येथे होणार असलेल्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली तर यश शिंदे, पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांना कांस्यपदक मिळाले.
या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच अरविंद देशपांडे, हरिभाऊ राऊत, जिवन महाजन, सुनील मोरे, निकेतन खोडके, श्रीकृष्ण चौधरी, विजय चौधरी, शुभम शेटे यांनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.