जळगाव (प्रतिनिधी) संबंधित टेबलचे काम माझ्याकडे नाही असे सांगितल्याचा राग आल्याने जिल्हा उद्योग केंद्रातील महाव्यवस्थापक चेतन भा. पाटील यांनी उद्योग निरीक्षकाला जातीवाचक शब्द बोलून त्यांना पानउतारा केला. यामुळे त्यांची मानसिक व सामाजीक हानी झाल्याची घटना दि. १३ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये उद्योग निरीक्षक म्हणून अनिल ज्ञानेश्वर गाढे हे नोकरीस आहे. कार्यालयीन कामकाज रीत असतांना त्यांनी कार्यालयात सुरु असलेले अनेक गैरव्यवहार निदर्शनास आणले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रारी केलेल्या होत्या. तेव्हापासून महाव्यवस्थापक चेतन पाटील हे कार्यालयात गाढे यांच्यावर राग करुन त्यांना हीणपणासह अपमानास्पद वागणूक देत होते. दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात माहितीच्या अधिकाराच्या कामकाजासाठी जुगल श्रीनिवास पाटील हे तर पीएमईजीपी योजनेच्या कामासंदर्भात भगवान कोळी, विशाल अरुण वाघ हे आले होते. ते महाव्यवस्पकांना भेटल्यानंतर त्यांनी अनिल गाढे यांना भेटा असे सांगितले. त्यानुसार ती तिघे गाढे यांच्याकडे आले. परंतु त्यांना पाहिजे असलेले टेबल त्यांच्याकडे नसल्याने सांगितल्यानंतर त्या तिघांनी गाढे यांना तुम्ही साहेबांकडे आमच्यासोबत चला, असे सांगितले.
माहिती देवू शकत नसल्याने केला पानउतारा उद्योग निरीक्षक अनिल गाढे हे तिघांसोबत महाव्यवस्थापक यांच्याकडे गेले. त्यांनी माहिती अधिकार व पीएमईजीपी योजनेचे काम माझ्या टेबलला नसल्याने त्यांना माहिती देवू शकत नसल्याचे सांगितले. त्यांना उलटून महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी गाढे यांना जातीवाचक बोलून तीन अभ्यंगतासमोर त्यांचा पानउतारा केला. त्यामुळे गाढे यांची मानसिक व सामाजीक हानी झाली आहे. त्यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.