धरणगाव (प्रतिनिधी) क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व थोर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून उचित कारवाई करण्याची मागणी येथील माळी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत आज माळी समाजाच्यावतीने निवेदन पोलिसांना निवेदन देण्यात आले.
अमरावती येथील सभेत संभाजी भिडेंनी थोर महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करून चारित्र्यहनन केले. याच सभेत महात्मा फुले यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरून एकेरी भाषेत उल्लेख केल्याने बहुजन समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे माळी समाजातील सर्व स्तरावरून भिडेंचा निषेध केला जात आहे. त्यामुळेच संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी विठोबा महाजन, निंबाजी माळी, व्हि.टी. महाजन, विजय महाजन, नंदलाल माळी, रामचंद्र माळी, गोपाल बाविस्कर, सुखदेव महाजन, कैलास वाघ, प्रभुदास जाधव, प्रमोद पाटील, शिवाजी देशमुख, हेमंत माळी, दीपक महाजन, ओ. एस. माळी, संजय महाजन, प्रवीण महाजन, रवि महाजन, विलास महाजन, दिगंबर माळी, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, दिलीप माळी, रमेश महाजन, कैलास माळी, भानुदास विसावे, प्रवीण (टोनी) महाजन, भैय्या महाजन, ज्ञानेश्वर (धाकला) महाजन, हरीश्वर महाजन, समाधान माळी, गुलाबराव महाजन, निंबा चौधरी, भटूलाल महाजन यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.