बोदवड (प्रतिनिधी) झाडे आपल्या जीवनात एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतात असे समजून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी केले. ते बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचे ‘गो ग्रीन’ क्लब चे वतीने हरित महाविद्यालय ,हरित बोदवड उपक्रमा अंतर्गत वृक्षरोपे वाटप कार्यक्रमात बोलत होते.
प्राचार्य चौधरी यांनी वातावरण बदलामुळे निर्माण झालेली संकटे, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आशा अनेक आव्हानांना सामोरे जातांना वृक्ष लागवड व संवर्धन कीती महत्वाचे आहे व त्यांचे आपल्या जीवनातील स्थान किती मोलाचे आहे हे नमूद केले. तसेच त्यांचे संगोपन करतांना घरच्या लोकांसारखे त्यांच्यावर प्रेम व काळजी करण्याचे आवाहन केले. विभागप्रमुख डॉ. गीता पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश नमूद करतांना झाडेच आपले खरे मित्र असून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी ओळखून झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, हे सांगितले. यावेळी सर्व विद्यार्थ्यानी झाडांची रोपे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली रोपे वेगवेगळ्या ठिकाणी लावून त्यांच्या संगोपनाची प्रतिज्ञा घेतली. सूत्रसंचालन वैभव पाटील याने तर आभार संदीप बर्डे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. चेतनकुमार शर्मा, नरेंद्र जोशी, डॉ. रुपेश मोरे, डॉ. रुपाली तायडे, कांचन दमाडे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजू धोबी, नामदेव बडगुजर , प्रियंका महाजन, साक्षी कल्याणकर, सलोनी तिरोळे यांनी परिश्रम घेतले.
















