जळगाव (प्रतिनिधी) दवाखान्यातील गर्दीचा गैरफायदा घेत ४७ वर्षीय महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करुन विनयभंग करणा-या एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जीवन पाटील, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 16 जून रोजी सायंकाळी दवाखान्यात गर्दी होती. त्या गर्दीचा गैरफायदा घेत अनिल पाटील हा दवाखान्याच्या गर्दीचा फायदा घेऊन पिडीत डॉक्टरला हाताने असभ्यपणे स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे वारंवार स्पर्श करत होता. त्यामुळे पिडीत महिला डॉक्टरने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत 22 जून रोजी संबंधीत इसमाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 442/2022 भा.द.वि. 354 अ नुसार हा गुन्हा दाखल केला. पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील पुढील तपास करत आहेत.