मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात नावाजलेले तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार नुकतेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी घोषित केले आहे. ते पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत.
यावेळी डाॅ. विजया वाड, डॉ. श्रीकांत पाटील, मा. कांचन अधिकारी, मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका सौ. दिपाली केळकर व डॉ. मृण्मयी भजक, श्री प्रकाश राणे, डॉ. कृष्णदेव गिरी, श्री चिंतामण शिरोळे, डॉ. मा.ग.गुरव, डॉ. राजेश गायकवाड, श्री सुनील माळवे, श्री अशोक शिरसाठ, प्रा.सौ. दिपाली सोसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. पुढील पुरस्कार सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड, मुंबई , जीवन गौरव पुरस्कार, श्री. चिंतामण शिरोळे, सटाणा, जीवनगौरव पुरस्कार, ह.भ.प. सुनील माळवे, नाशिक आदीशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार, श्री भागवत दगडू राठोड कु-हा -काकोडा ता. मुक्ताईनगर, श्री कल्याणराव भवर ता. अंबड जि. जालना, श्री तुकाराम जावळे ता. पैठण जि. औरंगाबाद, यांना बळीराजा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार, उत्कृष्ट संचलनासाठी सौ. दिपाली केळकर व डॉ. मृण्मयी भजक, मुंबई आदींना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
पुरस्कार तर साहित्य पुरस्कार पुढीलप्रमाणे कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कादंबरीकार तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांची गाजलेली कादंबरी लॉकडाऊन, मराठी सिरीयल दामिनीच्या निर्मात्या, अभिनेत्री कांचन अधिकारी मुंबई , ती, तो आणि आकर्षण कथासंग्रह, श्री अशोक शिरसाट, पनवेल जि. रायगड, काव्यसंग्रह, प्रा. साईनाथ पाचारणे, पुणे माझ्या वाट्याची लोकशाही, कवितासंग्रह, श्री संजय गोराडे नाशिक, निर्णय कथासंग्रह, श्री विनोद नाईक गोवा, निशिगंध काव्यसंग्रह, श्री रवींद्र जवादे मुर्तीजापुर, गायी गेल्या रानात, ललित लेखसंग्रह, डॉ. शारदा निर्मळ महांडुळे, अहमदनगर, एकटीच या वळणावर कथासंग्रह संकीर्ण साहित्य, अभिनेते श्री प्रकाश राणे, नवी मुंबई, वांझोटा कादंबरी, डॉ. मोहन खडसे, अकोला, जगणे आनंदाचे लेखसंग्रह, सौ. वंदना कुलकर्णी, सोलापूर, तळ शोधतांना काव्यसंग्रह, श्री प्रकाश साखरे, इचलकरंजी, कोल्हापूर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. मा. गं. गुरव यांचा शततारका बाल काव्यसंग्रह, श्री विनायक चौगुले, बालकथा संग्रह छोट्यांच्या कथा, श्री प्रकाश श्रीपती पाटील पन्हाळा जि. कोल्हापूर, माझी शाळा माझे उपक्रम- संकीर्ण, श्री सचिन वसंत पाटील कर्नाळ जि. सांगली कथासंग्रह गावठी गीचचा, सौ अनुराधा कृष्णा म्हाळशेकर, गोवा कवितासंग्रह पहाट, डॉ. अनंता सुर, यवतमाळ साहित्य संमेलनं अनेक अध्यक्षीय भाषण एक, श्री गणेश भाकरे, नागपूर माझा विठू माऊली की विठोबा काव्यसंग्रह या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
इतर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, सांगली, योग सदगुरु पुरस्कार, श्री लक्ष्मण दगडू पिंपरीकर मुक्ताईनगर, श्री किशोर नेवे जळगाव, सौ. आशाबाई बाविस्कर, चोपडा, यांना समाजसेवा, डॉ. खुशाल मुंडे, पुणे आदर्श प्राचार्य पुरस्कार, श्री प्रकाश बावस्कर, कु-हा-काकोडा, श्री सुनील काशिनाथ पाटील, पारंबी आदर्श शिक्षक, डॉ. प्रा. अजय पाटील, जळगाव, श्री प्रदीप काळे हरताळे, ता मुक्ताईनगर, समाजसेवा, श्री पुरुषोत्तम गड्डम, बोदवड, श्री ईश्वर महाजन, अमळनेर उत्कृष्ट पत्रकारिता, शेख अल्ताफ शेख रज्जाक, मुक्ताईनगर, श्री यशवंत महाजन पारोळा, आदर्श शिक्षक, श्री गिरीश भंगाळे, रावेर, आदर्श शिक्षक, प्रा. सौ. दिपाली आतीश सोसे अकोला, सौ वर्षा पाटील को-हाळा ता. रावेर समाजसेवा, श्री समाधान जाधव, भुसावळ, आदर्श शिक्षक, डॉ. नम्रता महाजन जळगाव, आदर्श शिक्षक, श्री छोटूलाल भोई, मुक्ताईनगर , आदर्श शिक्षक ,सौ संगीता फिरके , न्हावी,श्री किशोर कासार कु-हा- काकोडा ता. मुक्ताईनगर, उत्कृष्ट पत्रकारिता, श्री प्रशांत धिवंदे, नाशिक ,उत्कृष्ट पत्रकारिता, श्री अमोल गावंडे, वडोदा ता.मुक्ताईनगर ,आदर्श शिक्षक, श्री सचिन कुसनाळे, सांगली, आदर्श शिक्षक, प्रा. बी. जी. माळी मुक्ताईनगर, आदर्श शिक्षक, श्री चंद्रमणी इंगळे, मुक्ताईनगर, आदर्श शिक्षक, श्री किशोरबापू गावंडे, मुक्ताईनगर समाजसेवक, सौ मनीषा पाटील भुसावळ, आदर्श शिक्षक, श्री संजय सूर्यवंशी साकरी जि. धुळे, आदर्श शिक्षक, श्रीमती मीनाक्षी झांबरे जळगाव, आदर्श शिक्षक, श्री राजेंद्र ठाकूर नेरी ता. जामनेर, आदर्श शिक्षक श्री गणेश निकम, चाळीसगाव उत्कृष्ट निवेदक, आदी पुरस्कार जाहीर करण्यात आले. या सर्व पुरस्कारार्थीचे फाउंडेशनतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. वरील पुरस्कार मे २०२१ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. असे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केले आहे.