जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १५ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले यातून पहिले चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली.
स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या
स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न झाल्या असून जिल्ह्यातील एकूण ६८ खेळाडूंनी सहभाग घेतला. येथे नाशिक दिनांक १८ ते २० ऑक्टोबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली.
मुले
तसीन तडवी,टिळक सरोदे, राज बुवा,जयेश सपकाळे
मुली
माही संघवी,झुनेरा शेख,इमान शेख,गुंजल नेमाडे तर विशेष उत्तेजनार्थ मुलींमध्ये ईशान राठोड, अरीबा चौधरी, तर मुलांमध्ये क्षितीज वारके, अंकित दुगड, यांना मेडल देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, अभिषेक जाधव,आकाश धनगर,स्वप्निल निकम,यांनी काम केले. पारितोषिक वितरण जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे नथु सोमवंशी प्रवीण ठाकरे,यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, व पदाधिकारी यांनी केले.