भुसावळ (प्रतिनिधी) मुंबईहून प्रयागराजकडे निघालेल्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सतना रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी एस.पी.शुक्ला हे पत्नीसह मुंबई ते सतना असा विनातिकीट प्रवास करीत असल्याने कर्तव्यावरील सीटीआय मनोज सिन्हा यांनी तिकीटाची विचारणा केल्यानंतर कर्मचार्याने सिन्हा यांना धमकावत मारहाण केली. हा प्रकार ईगतपुरी स्थानक सुटल्यानंतर सोमवारी सायंकाळी घडला. वाद वाढतच गेल्यानंतर सिन्हा यांना भुसावळ नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर शुक्ला यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले व त्यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
12293 दुरांतो एक्स्प्रेसच्या एसी सेकंड कोचमध्ये सतना रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी एस.पी.शुक्ला हे पत्नीसह मुंबई ते सतना असा प्रवास करीत होते मात्र ते कर्तव्यावर नसताना व त्यांच्याकडे प्रवासाचे कुठलेही तिकीट नसल्याने कर्तव्यावरील मुंबई विभागाचे सीटीआय मनोज सिन्हा यांनी विचारणा केल्यानंतर शुक्ला यांना राग आला व त्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली. हा प्रकार शुक्ला यांनी भुसावळ येथे कळवल्यानंतर यंत्रणेने शुक्ला यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, शुक्ला यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याची माहिती असून त्यांनी कोच अटेंडंटसोबतही गैरव्यवहार केल्याची चर्चा आहे.
याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या दबंगगिरीचा निषेध नोंदवण्यात आला असून या कर्मचार्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी चेकींग स्टॉपचे कर्मचारी उपस्थित होते. हा गुन्हा ईगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
















