धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे शाळेच्या प्राध्यापिका माननीय सौ. वैशाली नितीन पवार यांनी पूजन केले, व त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की प्राध्यापिका पवार यांच्याहस्ते प्रतिमा पूजनानंतर अध्यक्ष स्थान घोषित करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय मोरे सर (PI) जळगाव, व प्रमुख पाहुणे म्हणून सुनील चौधरी सर (अध्यक्ष कर्तव्य बहुउद्देशीय संस्था धरणगाव) हे लाभले. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे चिमुकले बालक यांनी वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांची भूमिका साकारली,त्या विद्यार्थ्यांना यथोचित सन्मान देऊन त्यांचे स्वागत व सोबत बक्षीस देण्यात आले. चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीचे आपले मनोगत भाषणाच्या माध्यमातून सर्वांसमोर अतिशय उत्कृष्टपणे मांडले. त्याच सोबत शाळेतील प्रत्येक शिक्षकांच्या स्वभावाला अनुकरण मुलांनी कविता सादर केल्या व गीत पण सादर केले. यावेळी आमच्या स्कूलच्या सौ शुभांगी पाटील, तहझिब खाटीक, सिमरन, छाया , तीलोचना बडगुजर , भावना चौधरी, शीला, अंकिता पाटील, राधा या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा हलम मॅम यांनी केले. मोरे सरांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्यांचे मार्गदर्शन पण गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांना लाभले. त्यानंतर स्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व शिक्षकांना भेट वस्तू देऊन सन्मानित केले.शिक्षकेतर कर्मचारी सौ.माधुरी ताई पाटील व सौ. राखी ताई पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता परिश्रम घेतले. वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाचा समारोप झाला.