जळगाव प्रतिनिधी – ( असोदा ) भारतीय संविधान हे जगात सर्वोत्तम असे संविधान असून शालेय शिक्षणातच शिक्षकांनी अध्यापन करत असताना आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यात संविधानाची मूल्य मनापासून रुजवावीत जेणेकरून भारताची नवीन पिढी युवकांमध्ये संविधानाबद्दलची सजगता आणि एक आदर्श नागरिक या देशाला प्राप्त होतील असे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे भारतीय संविधान दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले त्यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले अध्यक्षस्थानी कोमल नारखेडे ही विद्यार्थिनी होती याप्रसंगी बोलताना कोमल नारखेडे म्हणाली, भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेबरोबर बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत संविधान सोबत असते शिक्षणाचा अधिकार हा सर्वोत्तम अधिकार असून या अधिकारातून आपला सर्वांगीण विकास व जीवनाचा विकास सुद्धा आपण करू शकतो म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपण सगळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी मांडले. कार्यक्रमास मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे. पाटील उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संविधानावर आधारित गगनभेदी घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सौ. शुभांगीनी महाजन यांनी केले.विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रशांत कोल्हे यांनी केले. बक्षीस वाचन चित्रकला शिक्षिका मीनाक्षी कोल्हे यांनी केले.सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार सचिन जंगले यांनी मानले. संविधान सभेतील सदस्य यांची प्रतिकृती लोकेश नाथ, सौरव कुंभार, अमित बिऱ्हाडे, तेजस कुंभार, रिजवान पिंजारी, वैष्णवी पाटील, हर्षाली पाटील, ताक्षी माळी, रुत्वा भोळे, हर्षू पाटील, प्रणाली माळी ह्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी साकारली चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक जयश्री मराठे, द्वितीय क्रमांक वैष्णवी पाटील, तृतीय क्रमांक हर्षाली पाटील, उत्तेजनार्थ यामिनी भारुळे, हितेश सोनवणे, सृष्टी डोळसे, नूतन वाणी या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.
















