मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदाची निकालाची टक्केवारी ९९.९५ टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक १०० टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा ९९.५५ टक्के आहे. पूर्नपरिक्षर्थी निकालाची टक्केवारी ९०.८६ इतकी आहे. ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९९.९६% इतकी आहे. मुलांची टक्केवारी ९९.९४% असून राज्यातील २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १००% लागला आहे. ६९२२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.
परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झालंय ,सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया दिनकर पाटील दिली आहे. तसंच श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
असा तपासा तुमचा निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा
SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.
आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.
लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.