चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव – कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ आज भिषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हर्षल संतोष ठाकरे (वय-२८ रा. सांगवी ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (वय-२२ रा. धनसनि भांदलगाव, राज्य उत्तराखंड) असे दोघं मयतांची नाव आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१२- वरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेलजवळ झालेल्या भिषण अपघातात हर्षल संतोष ठाकरे व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल शहा या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) घडली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचणामे केले.