वर्धा (वृत्तसंस्था) वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सावंगी इथल्या मेडिकल कॉलेजचे हे विद्यार्थी होते. एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Wardha) झाला आहे. यात आमदार विजयभाऊ रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचे एकुलते एक सुपुत्र अविष्कार रहांगडाले यांचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेत मरण पावलेले सर्व सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की नदीवरुन पुल तोडून गाडी खाली कोसळली. जवळपास ४० फूट पुलावरून हे वाहन खाली पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री एक वाजता जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलीस आणि प्रशासन सध्या पुढील तपास करत आहेत. नीरज चव्हाण, अविष्कार रहांगडाले, नितेश सिंह, विवेक नंदन, प्रत्युष सिंह, शुभम जैसवाल, पवन शक्ती, अशी अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.