बालासोर (वृत्तसंस्था) ओडिशातील बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २३३ हून अधिक जणांचा मृत्यू भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर ९०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले झाले आहेत. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत.
कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून २३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरून चेन्नईला रवाना झाला होती. आज ( २ जून ) ओडिशातील बहनागा स्टेशनजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोरा-समोर आली. त्यामुळे ट्रेनच्या स्लीपर बोगी वगळता संपूर्ण ट्रेन(17-18 डब्बे) रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन एका मालगाडीला धडकली आणि नंतर रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सिग्लनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही ट्रेन एकाच पटरीवर आल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याचीही बाब समोर येत आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता की रेल्वेचे इंजिन मालगाडीवर चढले. या धडकेत कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे मोठे नुकसान झाले. जवळपास संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरली.
तर आज सकाळच्या ताज्या वृत्तानुसार रेल्वेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ट्रेन क्रमांक 12841 चेन्नई सेंट्रलहून शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ही गाडी शालिमारकडे रवाना झाली होती. खरगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. अप आणि डाऊन दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.