पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा परिसर विकास मंचचे ध्यान केंद्र या ठिकाणी नुकतीच वृक्ष मोहीम राबवली होती. जळगाव मनपाचे वित्त लेखाधिकारी कपिल पवार यांच्या संकल्पने वृक्ष मोहिमेअंतर्गत निंब, मेहंदी व इतर वृक्षाचा समावेश करण्यात आला होता. ध्यान केंद्रातील वृक्षांनी आता झपाट्याने वाढ घेतल्यामुळे परिसर निसर्गरम्य बनला आहे.
वृक्षांना ट्रंकरच्या साह्याने ठिबक नळीने पुरवठा केला जातो. तसेच मंचने बोरवेल केला असून त्यात कीटकनाशक,फवारणी, विविध औषधींच्या मदतीने निगा राखली जात आहे. यासाठी विकास मंचची टिम तत्तपरने उभी असते. झाडाना रंगरंगोटी देखील मंचच्या टीमने केली आहे. वृक्षांनी वाढ धरल्याने नागरिक या ठिकाणी व्यायम किंवा वाकिंगसाठी येत असतात. या ठिकाणी अभ्यासिका खोली असून स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी तयारी करतात. या निसर्गरम्य परिसरात निंबासह मेहंदी व इतर वृक्ष लावलेली आहेत. परिसरात हायमास्ट लॅप या ठिकाणी आहेत. पातोंडा परिसर विकास मंचची टिम या परिसरावर सतत लक्ष ठेवून असते. जळगाव मनपाचे वित्त लेखाधिकारी कपिल पवार यांचे देखील परिसरावर जातीने लक्ष असते. ध्यान केंद्राच्या परिसरात वॉल कंपाउंड, गेट इत्यादी सुविधा विकास मंचने केल्या आहेत. तसेच लहान झाडांना संरक्षण म्हणून जाळया बसवल्या आहेत. तर खतपाणीच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तथा विकास मंचचे सदस्य विलास चव्हाण लक्ष ठेवून असतात.