जळगाव (प्रतिनिधी) गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. तेलाच्या (kitchen oil) किमती २५ ते ३० रुपयांनी वाढल्यानं सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडू लागला आहे. दरम्यान, जळगावात एकाच दिवसात तेलाच्या पाऊचच्या किंमतीत ८ रुपयाची वाढ झाली आहे.
आठवडाभरापूर्वी ९०० एमएल तेलाचे पाऊच १३२ रुपयांना घाऊक बाजारात मिळायचे. त्यात २८ रुपयांची वाढ झाली. आठवडाभरातील ही दुसरी वाढ आहे. मंगळवारी ८ रुपयाने तेलाचे पाऊच महागले. आठवड्यापूर्वी ९०० एमएल पाऊच १३२ रुपये हाेते. ते मंगळवारी १६० रुपयांवर पाेहाेचले आहे. युक्रेनमधून भारताला सूर्यफुलाची आवक हाेते. युद्धामुळे ती बंद झाल्याने ही दरवाढ झाली आहे. जाेपर्यंत युद्धाचे सावट दूर हाेत नाही, ताेपर्यंत तेलाचे भाव चढते राहण्याचा अंदाज आहे.
असे आहेत खाद्यतेलाचे दर
खाद्यतेलात सर्वात महाग शेंगदाणा तेल १६० रुपये किलाे हाेते. त्या खालाेखाल सूर्यफूल तर सर्वात स्वस्त साेयाबीन तेल हाेते; परंतु गेल्या आठवड्यात हे चित्र बदलून साेयाबीन १३२ वरून १६०, सूर्यफूल १४० वरून १५० रुपये तर शेंगदाणा तेल १४० वरून १६० वर पाेहाेचले आहे.