भिवंडी (वृत्तसंस्था) भिवंडी शहरात आज पहाटे एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिक लोकांनी २० लोकांना बाहेर काढले. तर सध्या ढिगाऱ्याखाली २०-२५ लोकं अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कमकुवत झाली होती. तशात सोमवारी पहाटे ३.४० वाजेच्या सुमारास बहुतांश लोक झोपेत असतांना ही दुर्घटना घडली. यामध्ये २१ कुटुंबे राहत होती. एनडीआरएफच्या पथकाने सोमवारी सकाळी ढिगाऱ्याखालून एक मुलाला सुखरुप बाहेर काढले. ही इमारत १९८४ मध्ये बांधली असल्याची माहित समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास २० जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.