नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या अंडर-१९ संघाचा कर्णधार अवि बरोटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २९ वर्षीय अवि सौराष्ट्रकडून खेळत होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली. अविने यावर्षी सय्यद मुश्ताक अली करंडकातही शानदार शतक झळकावले होते.
सौराष्ट्र व्यतिरिक्त, अवी बरोट हरियाणा आणि गुजरातसाठी देखील तो क्रिकेट खेळला होता. तसेच तो टीम इंडियाच्या अंडर -१९ संघाचा भाग होता. रणजी क्रिकेट चॅम्पियन संघाचाही भाग होता. अवि बरोटच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे अविच्या जाण्याने दुःख झालं असल्यातं सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अवि बरोटचं निधन झाल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अवि बरोट एक उत्तम फलंदाज होता. अवि ऑफ-ब्रेक गोलंदाजी तसंच यष्टीरक्षण देखील करायचा. अविने एकूण ३८ प्रथम श्रेणी सामने खेळलेत. ज्यात त्याने १५४७ धावा केल्या. त्याच वेळी, सुमारे ३८ लिस्ट ए सामन्यांमध्ये १०३० धावा केल्या गेल्या. केवळ २० टी -२० सामन्यांमध्ये ७१७ धावा केल्या. जेव्हा सौराष्ट्राच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा अवि बरोट त्या विजयी संघाचा भाग होता. अविने सौराष्ट्रसाठी २१ रणजी सामने, १७ लिस्ट ए सामने, ११ टी -२० सामने खेळले आहेत. अवि बरोट यावर्षी मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला.