चोपडा (प्रतिनिधी) भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांना भेटण्यासाठी चोपडा तालुका समनव्यक समाधान बाविस्कर हे स्वतंत्र दिवसाच्या पूर्व संध्येला दि १४ रोजी गेले होते. यावेळी के.सी.राव यांनी बाविस्कर यांच्याकडून चोपडा विधानसभा क्षेत्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
मुख्यमंत्री के.सी.राव यांनी विधानसभा क्षेत्रात येणारी गाव, जि.प. सदस्यांची संख्या, पंचायत समितीचे सदस्यांची संख्या, शेतातील मुख्य पिकांची माहिती, तालुक्याचा विकासाबाबत, सातपुडातील आदिवासींचे जीवनमान, पाण्याची स्थिती, आजपर्यंत कोण कोण आमदार राहिले आणि त्यांचे पक्ष,आणि त्यांनी केलेला विकास याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
एवढेच नव्हे तर, तालुक्यात एकूण नदया आणि धरणे किती?, या विषयीसुध्दा माहिती घेतली. जवळपास तीन तासात संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा लेखाजोखा त्यांनी समजून घेतला. भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे उमेदवार दिला तर त्याच्याकडून जनसामान्यांच्या काय अपेक्षा असतील?, याबाबतही मुख्यमंत्री के.सी.राव यांनी मत जाणून घेतले.
विधानसभेच्या अगोदर पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूकित संपूर्ण व सक्षम उमेदवार दया, असे आदेशही मुख्यमंत्री के.सी.राव यांनी समाधान पाटील यांनी सांगितले. यासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष घरा घरापर्यंत पोहचवा अश्याही सूचना त्यांनी दिल्या. समाधान बाविस्कर सोबत जळगाव जिल्ह्यातून अनेक मंडळी हजर होती. समाधान बाविस्कर यांनी आतापर्यंत पक्षाचे चांगल्या प्रकारे काम सांभाळले, यावर मुख्यमंत्री के.सी.राव यांनी समाधान व्यक्त केले. ज्यांना पक्षात प्रवेश करायचे असेल त्यांनी फोन करा व नाव द्या ज्यांना पचायत समिती व जिल्हा परिषद चोपडा नगर पालिका लढवाईची असेल त्यांनी या नबर वर 9657379184 सपर्क करा समाधान बाविस्कर असे आवाहन केले आहे.