धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून धरणगाव शहरासह तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून नागरिक या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. याकडे तात्काळ लक्ष देवून समस्याचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून भर उन्हात बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. तसेच शेतकरी दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी विसावा घेत असतो. परंतु यावेळी नेमका विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने जनता त्रस्त झालेली दिसून येते. विजेच्या पुरवठ्याबाबत कर्मचार्यांनादेखील योग्य ती माहिती नसते व कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात. अश्या वेळेस शाब्दिक चकमकदेखील होत असते.