धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव शहरात संविधान चौकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची
मागणी संविधान समितीचे सदस्यांनी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्याकडे आज मागणी करण्यात आली
, धरणगाव शहरातील सर्व समाज बांधव, आपणास सविनय विनंती करतो की, शहराच्या मध्यवर्ती किंवा मुख्य रस्त्यावरील योग्य ठिकाणी ‘संविधान चौक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी संविधान समितीकडून करण्यात आली
भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून, ते आपल्या देशाचा आत्मा आहे. या संविधानानेच भारत विविधतेतही एकसंघ राहिला आहे. धर्म, जात, पंथ किंवा लिंग कोणताही असो. संविधान सर्वांना समानतेने वागवते आणि प्रत्येक नागरिकाला न्याय व हक्क प्रदान करते. हेच संविधान देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची मूल्ये जिवंत ठेवते.
या महान संविधानाचा आदर आणि गौरव करण्यासाठीच धरणगाव शहरात एक ‘संविधान चौक असावा अशी समाजाची तीव्र भावना आहे. हा चौक भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरेल आणि त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव करून देईल.
तरी, आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून, शहराच्या सौंदर्यात भर घालेल आणि सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी जागेची निवड करावी, अशी आमची विनंतो आहे. या महत्त्वपूर्ण मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना संविधान समितीकडून निवेदन देण्यात आले यावेळेस उपस्थित दिपक वाघमारे , भानुदास विसावे,बापू मोरे ,सुनील चव्हाण, पापाशेट वाघरे, नासिर मोमीन, बाळू जाधव, अजय मैराळे, सुधाकर साळुंखे ,धर्मराज मोरे ,अविनाश बाविस्कर, चेतन वाघरे, सागर भील, शिवा भील ,प्रल्हाद चव्हाण ,अशरफ भाई मोमीन, शहीद भाई मोमीन आदी उपस्थित होते.













