TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज : डॉ. सोमनाथ वडनेरे

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजात आज सर्वत्र नकारात्मकता वाढीस लागली असतांना वृत्तांकन करतांना एका समुपदेशकाची भूमिका निभविणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या वर्तमानपत्रांनी भविष्यपत्रे बनून समाजमन सशक्त बनविण्यासाठी तसेच भविष्यातील सुदृढ, निरोगी, निर्भय, व्यसनमुक्त आणि मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी वृत्तांकन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

स्व. विठ्ठल हिरणवाळे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मीडिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम पुष्प गुंफतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज या विषयावर व्याख्यान दिले. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीचा मजबूत स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनी एक जागरुक घटक म्हणून नेहमी चांगले कार्य केले आहे. सध्याच्या अनिश्चतेच्या काळात मानवीमन नकारात्मक बाजूने जास्त झुकत चालले आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांनी समुपदेशकाची भूमिका करण्याची आवश्यकता आहे. लोकांना वस्तुस्थितीची माहिती देत असतांना भयभीत न करता निर्भयतेचा आणि आश्वासक असे संतुलित वृत्तांकन करुन भविष्यातील सुदृढ समाज घडविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

नारदाबरोबर संजयची भूमिका करावी

नारदास आद्य पत्रकार मानतात. तीन लोकांची खबर त्यांना माहिती होत्या. मात्र आता वृत्तपत्रांनी संजयचीही भूमिका करावी. भविष्यातील मानवी समाजावर येणा·या संकटांचा, परिस्थितीचा अंदाज घेऊन निराशा, भय, चिंतेच्या गर्तेतून समाजास बाहेर काढण्याकरीता वृत्तांकनातून व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयचंद नगर येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीडिया प्रभागाचे जिल्हा समन्वयक महादु हिरणवाळे यांनी करुन देतांना सांगितले की, दरवर्षी या मीडिया व्याख्यानमालेचे आयोजन केले जाणार असून माध्यम क्षेत्रांतील अभ्यासकांचे विचार मंथन होणार आहे. उपस्थितांचे स्वागत बी.के. विजयादीदी यांनी तर अध्यक्षीय संबोधन बी.के. विद्यादीदी, शहादा यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन बी.के. योगीता बहन यांनी केले. कार्यक्रमास बी.के. कल्पनादीदी समवेत अनेकांचे सहकार्य लाभले. कोवीडच्या पाश्र्वभूमीवर सदरहू व्याख्यानाचे प्रसारण कार्यक्रमाचे लाइव प्रसारण http://tiny.cc/NandurbarMedia युट्यूब लिंकवर करण्यात आले. त्याचा लाभ अनेक माध्यम प्रतिनिधींनी घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

महाराष्ट्र स्टुडेंट युनिअनच्या साखळी उपोषणाची सांगता ; शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून दागिने आणि रोकड लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026

सर्वसामान्यांना दिलासा ! डाळींच्या किंमती घसरल्या

November 4, 2020

पारोळा तलाठ्यासह पंटरला हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

October 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group