मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज 8,241 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 15,03,050 करोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.85 % एवढे झाले आहे.
तर आज राज्यात 6 हजार 190 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 89,06,826 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,72,858 (17.78 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 16,72,858 झाली आहे. राज्यात आज 127 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.62% एवढा आहे. सध्या राज्यात 25,29,462 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 12,411 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
















