TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राक्षसांना वेळीच ठेचायला हवं ; पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवार संतापले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणारा व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करून हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.

READ ALSO

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

पुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणारा व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असताना कबड्डीपटू असलेल्या चौदा वर्षाच्या मुलीवर नात्यातील मुलाने कोयत्याने वार करून तिचे शीर धडावेगळे करत खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत १४ वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे. याप्रकरणी ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय २१, सध्या-रा. चिंचवड) याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली मुलगी कबड्डीपटू असून आठवीत शिक्षण घेत होती. यश लॉन्स परिसरात ती दररोज कबड्डीचा सराव करण्यासाठी येत होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती पाच मैत्रिणींसोबत या ठिकाणी सरावासाठी आली होती. कबड्डी खेळून झाल्यानंतर ती मैत्रिणीसोबत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर तिघेजण त्या ठिकाणी आले.

शीर धडापासून वेगळं करण्याचा प्रयत्न

तिघांपैकी नात्यातील असलेला आरोपी भागवत याने तिला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वादावादी सुरू केली. त्याच रागातून आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीवर सपासप वार केले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मित्राने तिच्या मानेवर वार करून तिचे शीर धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी तिच्या सोबत असलेल्या मुलींना धमकाविले. त्यानंतर घटनास्थळी कोयते टाकून आरोपींनी पळ काढला. या घटनेने पुणे हादरले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

वीर सावरकरांबद्दल अनेक गैरसमज ते मुस्लिमांचे शत्रू नव्हते : मोहन भागवत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : १० वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 4, 2023

ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येची पालकमंत्र्यांनी घेतली दखल ; बाभळे येथे मुरूम टाकून शेतरस्ता केला तयार !

July 31, 2024

बोरगावला गोडाऊन फोडले, ७० हजाराचा ऐवज लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 7, 2023

जळगाव एमआयडीसीच्या कंपनीत चोरी : चोरट्याला मुद्देमालसह अटक !

July 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group