नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्व हिंदुस्थानीचा डीएनए हा एकच आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले आहेत. रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंच आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
एखादी व्यक्तीवर गर्दीद्वारे हल्ला चढवणे म्हणजेच मॉब लिंचिंग प्रकार हिंदू धर्मविरोधी आहे. धर्माच्या नावाखाली मॉब लिंचिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. एकतेशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. आपण लोकशाही देशात राहतो, यावर हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयच वर्चस्व गाजवू शकतात, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
मोहन भागवत यांनी पुढे म्हटलं की, राजकारण लोकांना एकत्र करू शकत नाही. राजकारण लोकांना एकत्र करण्यासाठीचं शस्त्र बनू शकत नाही, परंतु ते ऐक्य बिघडवण्याचे हत्यार बनू शकतं. आम्ही मतांच्या राजकारणात भाग घेत नाही. आमच्या देशात काय घडले पाहिजे याबद्दल काही कल्पना आहेत. आम्ही राष्ट्रीय हिताच्या बाजूने आहोत.