जळगाव (प्रतिनिधी) ब्रिज कम्युनिकेशन्स ही दृकश्राव्य माध्यमात कार्य करणारी उत्तर महाराष्ट्रातील आघाडीची निर्मिती संस्था आहे. या संस्थेने मागील २५ वर्षात सहाशे पेक्षा जास्त माहितीपट, ४ चित्रपट व ५ टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. भविष्यात आपल्या भागात चित्रपट व मालिका आणि वेब सिरिजची निर्मिती करणार असल्याचे संस्थेचे संचालक, निर्माता दिग्दर्शक मिलिंद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी संस्थेच्या नवीन अत्याधुनिक सिनेमा कॅमेराचीसुद्धा माहिती देण्यात आली. संस्थेचे है रौप्य महोत्सवी वर्ष असून अत्याधुनिक सिनेमा कॅमेरा व लेन्सेसच्या माध्यमातून दर्जेदार निर्मिती करणार असल्याचे त्यानी सांगितले आतापर्यंत व्यवसायिक चित्रपट, मालिका, माहितीपट, जीवनपट, शार्ट फिल्म, अल्बमची निर्मितीसाठी मुंबई. पुणे, कोल्हापूर यासारख्या शहरांवर अवलंबून रहावं लागत होतं. परंतू आता उत्तर महाराष्ट्रात जळगावसारख्या शहरात दर्जेदार चित्रपटासोबतच टीव्ही मालिका आणि वेब सिरिजची निर्मितीसुध्दा शक्य होणार आहे.
पत्रमहर्षी स्व. ब्रिजलालभाऊ पाटील यांच्या प्रेरणेने ब्रिज कम्युनिकेशन्स या संस्थेची मुहूर्तमेठ सन १९९५ साली झाली बदलत्या काळाबरोबर आधुनिकतेची कास धरत संस्थने गेल्या २५ यर्षात महाराष्ट्रात या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पर्धेच्या युगात बदल ही काळाची गरज आहे, हीच गरज लक्षात घेत अत्याधुनिक कॅमेरा लेन्सेस, साऊड सिस्टीम्स ही सुविधा उपलब्ध केली असल्याचेही पाटील यांनी सांगितले. लवकरच साम टीव्ही मराठी या वाहिनीवर दिपस्तभ ही मालिका नव्याने सुरु होणार असून यात महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणारे व्यक्ती व संस्थांचे प्रेरणादायी जीवनपट प्रदर्शित केले जाणार आहेत. ब्रिज कम्युनिकेशन्स ही संस्था सन १९९९ साली संस्था दूरदर्शनच्या वृत्त विभागात कार्यरत झाली जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील वृत्तसंकलनाचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत होते. आजही ते सुरुच आहे या कार्यकाळात शासकीय, निमशासकीय योजनांसह अनेक गंभीर विषयावर वृत्त मालिका तयार करण्याचे सौभाग्य ब्रिज कन्युनिकेशन्स्ला मिळाले आहे. गुटखा बंदी, खानदेशातील विशेषत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण, सिंचन प्रकल्प, आदिवासीमधील अंधश्रध्दा, पतसंस्था गैरव्यवहार, नर्मदा बचाव आंदोलन अशा अनेक विषयांवर विशेष वृत्त मालिका संस्थेने प्रसारित केल्यात
सन १९९९-२००० मध्ये खान्देशातील विविध क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या नररत्नांच्या जीवनकार्यावर आधारित खानदेशरत्न ही ३२ भागांची मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात आली. देशातील एखाद्या भागातील आदर्श व्यक्तीच जीवनकार्य एका साखळीत गुफणारी ही त्या काळातील पहिलीच मालिका उरली. अत्यंत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी, पद्मश्री डॉ. स्व. भवरलाल जैन याच्यासह अनेक विभूतीचे जीवनकार्य या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे सौभाग्य आम्हाला लाभल. या मालिकेची लोकप्रियता पाहून पुन्हा सन २०१०-११ मध्ये नव्याने २६ भाग प्रसारीत करण्यात आलेत. त्यालासुध्दा उत्तम प्रतिसाद मिळाला अशाच प्रकारची दिपस्तंभ ही महाराष्ट्रस्तरिय व्यक्ती व संस्था विषयक मालिका साम टिव्ही मराठीवर प्रसारीत केली आहे. आणि आता ही मालिका पुन्हा लवकरच साम टिव्ही मराठीवर नव्या दमाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सुरु करीत आहोत. संस्थेकडे स्वमालकीचा अद्ययावत असा एडिटींग सेटअप, साऊड रेकॉर्डींग, सगीत निर्मिती, क्रोमा स्टुडीओ. TULL HD प्रोफेशनल कॅमेरे, 4K कॅमेरे, हवाई चित्रिकरणासाठी ड्रोन इ. सामग्री उपलब्ध आहे. अनुभवी तंत्रज्ञ. संवाद लेखक, गीतकार, निवेदक आदी टिम उपलब्ध आहे. आणि हीच संस्थेची जमेची बाजू आहे
आज सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ब्रिज परिवारात सोनी कंपनीचा अद्ययावत असा सोनी एफएक्स ६ सिनेमा कॅमेरा (SONY FX 6 CINEMA CAMERA ) सोबतच आधुनिक सिनेमा लेन्सेस (ZEISS CP 2 CINEMA LENSES ) हे नवीन सदस्य सहभागी झाले आहेत. दुसरे महत्वाचे म्हणजे हा कॅमेरा मुंबईनतर फक्त आपल्या जळगावातच उपलब्ध झाला आहे. या कॅमेऱ्याला NETFLIX या आतराष्ट्रीय चॅनलची सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात चित्रपट, वेबसिरीज, म्युझिक अल्बम, टिव्ही मालिका, उच्चप्रतिच्या डॉक्युमेटरी, कॉर्पोरेट फिल्मस् इ निर्मितीची सुविधा उपलब्ध झाली आहे. ब्रिज कम्युनिकेशनच्या माध्यमातुन प्री प्रॉडक्शनपासुन तर पोस्ट प्रॉडक्शनपर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना येथे वाव मिळणार आहे. भविष्यात आमच्या संस्थेमार्फत मराठी चित्रपट, वेबसिरीज, म्युझिक अल्बम कॉर्पोरेट फिल्मस् डॉक्युमेंटरी असे विविध प्रकल्प सुरु करीत आहोत त्यामुळे स्थानिक कलावताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मनोरंजनातून जनजागृती या संकल्पनेतून संस्थेची वाटचाल गेल्या २५ वर्षांपासुन अविरतपणे सुरु आहे, ती यापुढेही अशीच सुरु राहील.
सामाजिक बांधिलकीतून संस्थेने आतापर्यंत ४ चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात सन २००५ मध्ये शेतकरी आत्महत्यांवर जनजागृती व्हावी, या उद्देशानं दिग्गज कलाकारांसोबत ह्या जन्मावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यानंतर नंदूरबार जिल्हातील आदिवासी भागात अंधश्रध्दा आणि अनिष्ठ प्रथांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र मानव मिशन यांच्या मदतीने कहाणी एका गावाची ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली हा चित्रपट नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासनाच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचे कामही संस्थेने केले आहे. २०१६ मध्ये जळगाव जिल्हा नियोजन विभागाच्या अर्थसहाय्यातून लाडकी हा चित्रपट तयार करण्यात आला. या चित्रपटातून बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ हा संदेश देण्यात आला तर २०१८ मध्ये पाण्याचं महत्त्व पटवून देणाऱ्या H20 कहाणी एका थेंबाची ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. सदर चित्रपट महाराष्ट्रातील १८० चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता.
ब्रिज कम्युनिकेशन्स २०११ पासून संस्था महाराष्ट्र शासनाच्या निर्माता पॅनलची सदस्य आहे. या माध्यमातून वनविभाग, सामाजिक न्याय विभाग, यशदा, जलयुक्त शिवार अभियान, पर्यटन आणि तिर्थक्षेत्र विकास, मुद्रा योजना, आरोग्य अशा विविध विषयांवर माहितीपट तयार करुन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारीत केले आहेत. आतापर्यंत संस्थेने विविध विषयांवर सुमारे ६०० पेक्षा जास्त माहितीपट तयार केलेले आहेत. त्यापैकी १०० पेक्षा जास्त माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्रीसह इतर वाहिन्यांवर प्रसारीत झाले आहेत. असे निर्माता दिग्दर्शक मिलिंद पाटील यांनी सागितले.