अमळनेर(प्रतिनिधी) मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनाने प्रताप महाविद्यालयमधील काही भाग अधिग्रहित केला होता. त्यामुळे कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराने कोविड-१९ संबंधित कामकाज चालू होतं. त्यात पेशंट चे isolation, त्यांचा डिस्चार्ज रोजची वाहतूक या सर्व गोष्टी होत्या. परंतु आता होम isolationचा पर्याय प्रशासनाने सुरू केल्यामुळे कोविड केअर सेन्टर मधील बाधित रुग्णांची संख्या देखील मर्यादित झाली आहे.
तसेच आता प्रताप महाविद्यालयाची नियमित कामे सुरू झाली आहेत त्यात प्रवेश प्रक्रिया,प्राध्यापक वर्गाचे नियमित येणे यासाठी मुख्य प्रवेशद्वार आता महाविद्यालयाने महाविद्यालयीन कामकाजासाठी वापरायला सुरवात केली तसेच कोविड केयर सेन्टर साठी पर्यायी मार्गाचा वापर सुरू केला आहे. मुख्य प्रवेशद्वाराकडून कोविड केयर सेन्टर ला जाणारा मार्ग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे.यापुढे प्रताप महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार महाविद्यालयाच्या कामासाठी वापरण्यात येईल असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे.
खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष योगेशदादा मुंदडे यांनी स्वतः लक्ष घालून याकामी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या यावेळी संचालक जितेंद्र जैन देखील उपस्थित होते.राकेश निळे,भटू चौधरी व इतर कर्मचारी वर्ग या कार्यात कार्यरत होते.