नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात एका नवजात बाळाला पित्यानेच विकल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पाचपावली (Pachpavli) पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पिता उत्कर्ष दहिवले आणि मध्यस्थ महिला उषा सहारे हे या प्रकरणातील आरोपी आहेत. एवढेच नाहीतर बाळाला विकून या पित्याने बाईक, होम थिएटर आणि कुलर खरेदी केल्याची माहिती पुढं आलीय.
नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील राणी दुर्गावती चौकात भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेलं एक दाम्पत्य राहत होतं. दोघेही मोलमजुरीची काम करत होते. मात्र पती उत्कर्ष दहिवले हा दारुडा होता. त्यानं दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे. दुसऱ्या पत्नीपासूनही मुलगी झाल्यानं तो नाराज होता. दुसरीही मुलगी झाली म्हणून दारुड्या बापानं चक्क आपल्या पोरीलाच विकण्याचा सौदा केला. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईनं तक्रार केली. त्यामुळं दारुड्या बापाला आता पोलिसांनी जेरबंद केलंय. मुलीच्या वडिलाच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली. तिने त्याला पैसे मिळवून देण्याचं अमिष दाखविलं. ती खाजगी अनाथ आश्रमात काम करते. तिने उमरेडमधील एका गरजू दाम्पत्याला पकडलं. 70 हजार रुपयांत बाळाचा सौदा केला. मात्र बाळाच्या आईला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली. पोलिसांनी बाळाच्या पित्याला आणि दलाल महिलेला याप्रकरणी अटक केलीय. अशी माहिती पाचपावली पोलीस स्टेशनच्या एपीआय मिनाश्री काटोले यांनी दिली.
पोटच्या मुलीला विकून वडिलाने बाईक खरेदी केली. हृदय हेलावणारी ही घटना नागपुरात घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलासह मध्यस्ती महिलेला अटक करण्यात आली. बापाचं काम हे मुलांचं पालन पोषण करण्याचं असते. पण, दारुड्या बाप असल्यानं त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. मोलमजुरी करत असल्यानं त्याला पैशाची कमतरता जाणवत होती. यासाठी त्यानं पैशाच्या मोहात चक्क मुलीलाच विकण्याचा बेत आखला. यात तो अडकला. त्याच्या पत्नीनंच तक्रार केल्यानं तो फसला. हा बाप साप निघाला. त्यानं चक्क आपल्या पोटच्या मुलीवरच घात केला. तिला तिच्या मायेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, आता तो यात फसला. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.