जळगाव (प्रतिनिधी) मोबाईलच्या टॉवरवरील रेडीओ फ्रिक्वेंसी मनिश व एझेडएनए कार्ड (आर आर युनिट) चोरणाऱ्यांसह ते खरेदी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या पथकाने जळगाव, धुळे व मालेगाव येथे दाखल असलेल्या २० गुन्ह्यांची उकल केली. अटकेतील संशयितांकडून चार गुन्ह्यातील २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरासह वेगवेगळ्या जिल्ह्यात मोबाईल टॉवरवर असलेले रेडीओ फ्रिक्वेंसी मशिन आणि (आर आर युनिट) चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शरद बागल, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, राहुल कोळी, किशोर पाटील, योगेश बारी यांच्या पथकाने घटनास्थळावर मिळालेल्या पुरावे गोळा केले. त्या पुराव्यानुसार बौधिक कौशल्याचा वापर करुन संशयित परवेज उर्फ बबलू मेहमूद पिंजारी (वय २९, रा. खंडेराव नगर) याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता, तो यापुर्वी मोबाईल टॉवरचे मेन्टेन्सचे काम करीत होता. त्याला टॉवर असलेल्या सर्व बाबींचा माहिती आणि अनुभव देखील होता.
मोबाईल टॉवरची संपूर्ण माहिती असल्याने परवेज उर्फ बबलू पिंजारी याने त्याचे साथीदार समीर शेख शाकीर शेख (रा. आझादनगर हुडको), गणेश पंढरीनाथ वानखेडे (रा. मयुर कॉलनी), सय्यद अनिस सय्यद मुस्तकीन (रा. चौधरीवाडा, चाळीसगाव) व अरबाज खान अमजद खान (रा. आझादनगर) यांच्या मदतीने मोबाईलच्या टॉवरवरील रेडीओ फ्रिक्वेन्सी चोरुन नेल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांना देखील पोलिसांनी अटक केली.
चोरट्यांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी एमआयडीसी, धरणगाव, यावल, जळगाव तालुका भुसावळ बाजारपेठ, नशिराबाद, शनिपेठ, मलकापुर शहर, रामानंद नगर, मोहाडीनगर धुळे व मलकापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्याविरुद्ध वर्षभरात तब्बल २० गुन्हे दाखल असून त्या गुन्ह्यांची कबुली संशयितांनी दिली.
अटकेतील संशयितांना खाक्या दाखविताच त्यांनी चोरलेले रेडीओ फ्रिक्वेन्सी मशिन हे पुणे येथील रिजवान अली निसार अली याला विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला देखील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २८ हजार रुपयांचे चार फ्रिक्वेंसी मशिन जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, हे मशिन चोरी करुन त्याची आंतराष्ट्रीय बाजारात त्याला आधिक मागण आहे. त्यामुळे ही आंतराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.