मुंबई (वृत्तसंस्था) एमएमआरडीएच्या सर्वोच्च सुरक्षा कंपनीकडून महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपयांची ढापले केली असून त्याचा वापर विदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून केला आहे. सोमय्या यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले आहेत. त्या पैशातून लंडन आणि विदेशात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तसेच इतर कंपन्यांमध्येही हा पैसा डायव्हर्ट करण्यात आला आहे. त्याचा तपास ईडी करत आहे. या पैशाचे लाभार्थी कोण? याचा शोध ईडी घेत आहे. त्या संदर्भातच ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर ठाकरे सरकार एवढी अढीबाजी का करत आहे?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. मुंबईबाहेरुन आल्यामुळे सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे.