धरणगाव (प्रतिनिधी) मागील १ महिन्या पासून शासनाने मका, ज्वारी, गहू खरेदीसाठी नाव नोंदली आहेत. परंतु आतापर्यंत शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी कृती समिती व शेतकरी बांधवानी धरणगाव तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने १ मे २०२१ पासून खरेदी सुरू करणार होते. तरीही अद्यापपावेतो खरेदी सुरू झाली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खरेदी झाली तर पुढील शेती पिकांसाठी बी-बियाणे रासायनिक खते घेता येतील व शेतकऱ्यांचा घरात असलेले धान्य खराब होणार नाही, तरी शासनाने लवकरात लवकर खरेदी सुरू करण्यासाठी धरणगाव तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना शेतकरी कृती समितीचे तालुका समन्वयक गोपाल पाटील, चंदन पाटील, शामकांत पाटील, भारत पाटील, गणेश महाजन, चंद्रकांत पाटील, विठोबा चौधरी, एकनाथ पाटील, नथू चौधरी, वाल्मीक पाटील, बापू जाधव, किशोर पाटील, भागवत पाटील, नरेश पाटील, राहुल पवार, पंकज महाजन, लोटन पाटील, सोपान पाटील, नितीन मराठे, निलेश चौधरी इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.