TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने काम केले. विभागाचे मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी अनेक ठिकाणी जाऊन धीर दिला, त्यामुळे त्यांचे कौतुक होणे हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्यावतीने स्व. ॲड रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा आज एसएम जोशी सभागृह येथे आयोजित केला होता. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, पी. डी. पाटील, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, सचिन ईटकर आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सह्याद्री फार्मर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कवयित्री अनुराधा पाटील यांना स्व.ॲड. रावसाहेब शिंदे पुरस्कार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अरूण गुजराथी, सह्याद्री फार्मर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कवयित्री अनुराधा पाटील यांची भाषणे झाली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

बाळासाहेब थोरात म्हणाले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना कालावधीत अत्यंत सक्षमपणे कार्य केले आहे. त्यातच चांगले नियोजन करून कोरोना परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास तयार झाला. तसेच कृषी तज्ञ यांनी शेती क्षेत्रात दिशादर्शक काम केले. कवयित्री अनुराधा पाटील यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जनतेची पहिली पायरी ही आरोग्य आहे. आरोग्य क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. त्यात खूप काही काम करण्यासारखे आहे. यामध्ये सर्वांना संतुष्ट करता नाही आले तरी सेवा मात्र करता येऊ शकते. कोरोना हा किती भयावह आहे, हे कोणालाही माहिती नव्हते. त्यावेळी त्याला धैर्याने सामोरे जाण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे अशी आपली भूमिका होती. कोरोनाकाळात एनआयव्ही, हॉस्पिटल, हॉटस्पॉट परिसर अशा विविध ठिकाणी कोरोना पसरत होता. त्याठिकाणी जाऊन नियोजन करणे गरजेचे होते आणि त्यादृष्टीने काम केले आहे. या सर्व कामाचे डब्लुएचओने (जागतिक आरोग्य संघटनेने) कौतुक केले. कोरोना काळात टीमने काम केले. लोकांना विश्वास देणे गरजेचे होते. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. त्यासाठी सर्व हॉस्पीटल सक्षम, चांगली केली पाहिजे. त्यानुसार कोरोनाच्या टेस्टमध्ये सहा वेळा काम केले. त्यासाठी काही वेळा दंडही आकारले आहेत. कोरोनाकाळात अभ्यास करून अनेक गोष्टीवर काम केले. हे सर्व टीमवर्क आहे, त्यातून चांगले काम झाले आहे.

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, चांगले काम होण्यासाठी चांगली टीम आवश्यक आहे. त्यामध्ये टीमचा प्रमुख हा महत्त्वाचा आहे. कोरोनाकाळात राज्याच्या टीममध्ये राजेश टोपे हे चांगले कर्णधार लाभले म्हणून चांगले काम केले आहे. कृषीक्षेत्रात विलास शिंदे यांनी चांगले काम केले आहे. त्या खात्याचा मी मंत्री आहे. त्यामुळे आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सेंद्रीय शेती आणि लोकांना एकत्र करून मोठी उलाढाल केली आहे, ही प्रेरणादायी बाब आहे. राज्यात असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल. त्यासाठी विकेल ते पिकेल ही योजना सुरू केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

धक्कादायक ! अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी पुतळ्याची तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

June 15, 2022

जळगावात भरचौकात तरुणाचा निर्घृण खून !

June 8, 2023

आंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच आला हृद्यविकाराचा झटका !

November 26, 2023

सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार !

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group