जळगाव (प्रतिनिधी) जळगाव आगारातील आत्महत्या केलेला वाहक स्व. मनोज अनिल चौधरी यांच्या वारसास एस. टी. कामगार सेनेतर्फे आज १ लाखांची मदत देण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्व. मनोज चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने स्व. मनोज चौधरी यांच्या वारसांना एस. टी. कामगार सेनेतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, मनपातील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे , उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, एस. टी. कामगार सेनेचे आर.के. पाटील , गोपाळ पाटील, दिलीप सूर्यवंशी व प्रविण कूमावत आदी उपस्थीत होते.
















