धरणगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज लावण्यात आलेला होता. मागील ३ महिन्यांपासून फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे रंग धूसर झालेले पाहून मन विचलित झाले व काही जागृत धरणगावकर नागरिकांनी तहसिल प्रशासनाला राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन दिले होते. त्यानुसार प्रशासनाने घेत ध्वजावतरण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान जपला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त लावलेला राष्ट्राध्वज १५ ऑगस्ट २०२२ पासून अविरतपणे ऊन, वारा, वादळ, पावसाची तमा न बाळगता आनंदाने फडकत होता. डौलाने फडकणाऱ्या या राष्ट्रध्वजाकडे पाहून त्याग – समर्पण – बलिदान आणि राष्ट्रप्रेमाची अखंड प्रेरणा सदैव मिळत असते. मागील ३ महिन्यांपासून फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे रंग धूसर झालेले पाहून मन विचलित झाले व काही जागृत धरणगावकर नागरिकांनी तहसिल प्रशासनाला राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेत धरणगाव तहसिलचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी नगरपरिषदेला लेखी सूचना दिल्या. या सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून धरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दनजी पवार यांनी लेखी आदेश देऊन राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण करायला सांगितले. संबधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत अंमलबजावणी केली आणि याच अनुषंगाने राष्ट्रध्वजाचा मान-सन्मान जपला गेला. ‘आपला राष्ट्रध्वज आपला अभिमान’ या भावनेतून प्रशासनाने केलेल्या कार्याचे नागरिकांनी तोंडभरून कौतुक केले तसेच आभार देखील मानले.