जळगाव (वसीम खान) आज सायंकाळी शहरातील शिवाजी नगर स्मशानभूमीजवळील आर.वाय. पार्कमधून एका घरातून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह पाण्याची मोटार आणि बॅटरी, असा साधारण ४० हजाराचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यासंदर्भात अधिक अशी की, शहरातील शिवाजीनगर मशानभुमी जवळ जवळ पार्कमध्ये सामाजिक कार्यकर्ते युट्युब सहा हे भाड्याच्या घरात राहतात आज सकाळी नेहमीप्रमाणे ११:३० वाजेच्या सुमारास ते घरगुती कामानिमित्त बाहेर पडले व सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास घरी परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले आहे. घरात गेल्यानंतर त्यांनी बघितले तर घरमालकांची इन्व्हर्टरची बॅटरी, पाण्याची मोटार तसेच स्वतःचे साधारण १२ हजार रुपयांची रोकड अज्ञान चोरट्यांनी लंपास केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले. तोपर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. दरम्यान भरदिवसा झालेल्या घरापुढे परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
















