TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील ‘त्या’ तरुणाचे मारेकरी अवघ्या काही तासांत गजाआड ; धक्कादायक कारण आलं समोर !

काही दिवसांपूर्वी दिलेली धमकी दोघांनी केली खरी ; मोठ्या दगडाने ठेचले डोके !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणारा प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. जयभवानी नगर, मेहरूण) याचा खून झाल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह आढळून आल्याच्या अवघ्या काही तासांत मारेकऱ्यांना गजाआड केले आहे. या खुनाच्या मागे अनैतिक संबंधाचा संशय कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

हरवल्याची एमआयडीसी पोलिसात नोंद
प्रमोद हा जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) येथे दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामासाठी गेला होता. प्रमोद विद्यापीठात कॉन्टॅक्ट सिस्टीमवर काम करीत होता. परंतू तो सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. परंतू कुठेही प्रमोदचा तपास लागला नाही. त्यामुळे दि. 11 डिसेंबर रोजी वडील सुरेश हरी शेट्टी,( वय 63 वर्ष, रा. जयभवानी नगर, मेहरुण) यांनी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला हरविल्याबाबत तक्रार दिली. त्याप्रमाणे मिसींग दाखल करुन प्रमोदचा शोध सुरु होता.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

मृतदेह आढळून आल्यानंतर उडाली खळबळ
याच दरम्यान, आज दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील निमखेडी शिवारातील कचरा फॅक्टरीच्या लगत असलेल्या महादेव मंदीराच्या मागील बाजुस एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी सुरेश शेट्टी यांनी जावून सदरचे प्रेत हे त्यांचा मुलगा प्रमोदचे असल्याचे ओळखले होते. प्रमोदचा खून झाल्याचे परिस्थितीजण्य पुराव्यावरुन दिसत असल्यामुळे जळगाव तालुका पो.स्टे. गुरनं. 357/2022 भादवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदरचा खून हा कोणत्या कारणांनी झाला व कोणी केला याची माहीती काढणे सुरु केले होते.

एमआयडीसी पोलिसांनी मिळाली आरोपींबाबत गुप्त माहिती !
यादरम्यान एम.आय.डी.सी. पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाला माहीती मिळाली की, सदरचा खुन हा सत्यराज नितीन गायकवाड (वय 26 वर्ष, रा. गणेश नगर, जळगाव) आणि सुनिल लियामतखाँ तडवी (वय 26 वर्ष, रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा) यांनी केला आहे. तसेच ते उमाळा (ता. जि. जळगाव) शिवारात असलेल्या जंगलात लपून बसले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व गुन्हे शोध पथकाचे स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळकसर, छंगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील असे रवाना झाले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी प्रमोदचा खून केल्याचे कबुल केले. दोघां संशयित आरोपींना जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप विभागीय अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मोठ्या दगडाने ठेचले डोके
प्रमोदचा गळा समोरून धारदार हत्याराने कापलेला होता. तसेच दोन्ही हातांवर ठिकठिकाणी व पाठीवर दोन ठिकाणी तसेच मानेवर कापीव व खोल गंभीर जखमा दिसत होत्या. तसेच त्याचे डोके मोठ्या दगडाने ठेचलेले होते. त्याचा संपूर्ण चेहरा व अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. त्यामुळे प्रमोदचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

अनैतिक संबंधाच्या संशयाने केला घात 
सुमारे 2 वर्षापुर्वी प्रमोदच्या घरच्यांनी सुनिल तडवी यास घर भाडयाने दिले होते. त्याच्या घरी सत्यराज गायकवाड हा नेहमी ये-जा करीत होता. परंतू 6 महिन्यांपूर्वी सुनिल याने प्रमोद याच्याशी, “तु माझ्या पत्नीशी का बोलतो?. तिच्याकडे का पाहतो?, याकारणावरून भांडण केले होते. तसेच त्यानेच याबाबत एमआयडीसी पोलीसांत प्रमोदविरुध्द तक्रार दिली होती. दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे प्रमोदच्या घरच्यांनी सुनिल याच्याकडून सहा महिन्यांपुर्वीच घर खाली करून घेतले होते. तेव्हापासून सुनिल हा प्रमोद याच्यावर खुन्नस ठेवून होता. एवढेच नव्हे तर तर अधुन मधून सुनील व त्याचा मित्र सत्यराज गायकवाड असे दोघेजण आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देवून खुन्नस देत असतात, असे प्रमोदने आपल्याला वडिलांना सांगितले होते.

माझ्या बायकोचा पिच्छा सोड, नाहीतर तुला कायमच संपून टाकेन !
दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रमोद कामावरून घरी परत आला त्यावेळी सुनिल आणि सत्यराज या दोघांनी प्रमोदला घराजवळील रोडवर थांबवले होते. सुनिल याने, तू माझ्या बायकोचा पिच्छा सोडून दे नाहीतर तुला कायमच संपून टाकेन,अशी धमकी देवून शिवीगाळ केली होती. सदर घटनेबाबत प्रमोद याने घरी आल्याबरोबर आपल्या कुटुंबीयांनी सांगितले होते. दरम्यान, प्रमोद बेपत्ता झाल्या[पासून सुनील आणि सत्यराज हे देखील गायब होते. त्यामुळे प्रमोदचा खून या दोघांनीच केला असल्याचा कुटुबीयांनी व्यक्त केलेला संशय आज अखेर खरा ठरला.

 

पोलीस निरीक्षक जयपाल हिरेंचा अनुभव आला कामी !

अवघ्या आठ दिवसापूर्वी जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात हजर होऊन देखील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी खुनाचा उलगडा करण्यात मोठी भूमिका बजावली. गुप्त सूत्रांने मौखिक दिलेल्या माहितीला गंभीर घेत त्यांनी आपल्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. अगदी पथकासोबत स्वतः तपासात भाग घेत नेतृत्व देखील केले. यामुळेच अवघ्या काही तासात दोघां मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्थानकात अवघ्या काही दिवसांपूर्वी आले असले तरी, त्यांचा अनुभव आरोपींच्या शोधासाठी महत्वपूर्व ठरल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १३ डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मशीद जादूने पडली का? ; ओवैसींचा संतप्त सवाल !

October 1, 2020

Alex, Hacker Russo Que Ganha Milhões An Exagerar Das Slot Machines Computadores, Portátiles, Tablets, Accesorios Para Computadores En Popayán,

November 16, 2022

तरुणाचा चाकूने भोसकून खून ; आरोपीला न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

December 9, 2021

पुण्यातील तरुणीने मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर ; डिलिव्हरी बॉयनं युवतीसमोरच केलं हस्तमैथुन !

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group