एरंडोल (प्रतिनिधी) विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एरंडोल येथील मजूर ठार झाला. फरकांडे रस्त्यावरील भवानी जीनिग समोर २० रोजी हा भीषण अपघात झाला. राहुल दत्तू कुंभार (वय २२) असे मयत मजुराचे नाव आहे.
एरंडोल येथील राहुल कुंभार हा तरुण, विटांच्या ट्रॅक्टरवर मजूर म्हणून कामास होता. विटांनी भरलेले ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ सी.वाय हे १६०९) हे एरंडोलहून फरकांडेकडे जात होते. भवानी जिनिंग जवळ ट्रॅक्टरमधील दोरी लोंबकळत असल्याने ती दोरी वर ओढण्याच्या प्रयत्न करत होता. तोल गेल्याने तो चाकाखाली आल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. ट्रॅक्टर चालक विनोद कुंभार याला घटना दिसताच त्याने १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले. जखमीला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी राहुल यास मृत घोषित केले. याबाबत कासोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.