अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार कृषिभूषण पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक १५ चे लोकप्रिय नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या पाठपुरावामुळे संपूर्ण प्रभाग १५ मध्ये पथ दिवे लावण्यात आले आहेत. शहरात दिवाळी आधीच लखलखाट झाल्याने नागरिकांचा आनंद गगनाला भिडला आहे.
प्रभागात १० स्ट्रीट एलईडी लाईट श्रीराम कॉलनी ते बाळासाहेब ठाकरे चौक पर्यत लावण्यात आले आहे व नवीन डिपी बसविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आबांचे आभार मानले आहे. दिवाळीआधीच प्रभागात झगमगाट झाल्याने प्रभागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आंनद पाहायला मिळत आहे.