TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण हे अशोभनीय वर्तन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून विशेष पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसूली व नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. मात्र वर्षानुवर्ष वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ, मारहाण तसेच कार्यालयांमध्ये जाऊन तोडफोड करण्याचे प्रकार सुरु आहेत. शासकिय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अभियंता व कर्मचाऱ्यांना आपले शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमधील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चस्तरावरून पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.

READ ALSO

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

महावितरण स्वतः वीजनिर्मिती करीत नाही तसेच विजेचे दर देखील ठरवित नाही. विविध कंपन्यांकडून वीजखरेदी करणे आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने जनसुनावणीद्वारे निश्चित केलेल्या दरांप्रमाणे बिलांची आकारणी व वसूली करणे तसेच सुरळीत वीजपुरवठ्यासह इतर ग्राहकसेवा देण्याचे काम महावितरण करीत आहे. त्यानुसार महावितरण देखील एक ग्राहकच आहे. वीजबिलांच्या वसूली वरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. तरीही कोरोनाच्या आपत्तीमध्ये मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत एकाही थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. लॉकडाऊन कालावधीतील संपूर्ण वीजबिल भरले त्यांना २ टक्के सवलत देण्यात आली. तर विलंब आकार व व्याज माफ करून घरगुती ग्राहकांना तीन हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सोय सुद्धा महावितरणतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली होती.

तसेच कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मध्ये शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त करण्यासाठी मूळ थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. एवढी सवलत देणारी ही पहिलीच योजना आहे. राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांकडे सप्टेंबर २०२० पर्यंत ४५ हजार ८०४ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. या शेतकऱ्यांनी मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा व चालू बिलाचा भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीमध्ये तब्बल ३० हजार ४५० कोटी ५६ लाख रुपयांची माफी मिळणार आहे.

सद्यस्थितीत वीजबिलांची थकबाकी सुमारे ६५ हजार कोटींवर असल्याने बिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजबिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत. मात्र ती अव्हेरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात येत आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी थेट संवाद साधून विचारपूस करीत संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविले आहे.

वीज ही सर्वांसाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज आहे. मात्र मारहाणीचा अनुचित प्रकार घडलेल्या एखाद्या परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणार्‍या ग्राहकसेवेवर कदाचित परिणाम होण्याची शक्यता आहे. महावितरण केवळ सरकारी कंपनी असल्याने वीज ही मोफत असल्याच्या गैरसमजातून अनेक थकबाकीदार वर्षानुवर्ष वीजबिल भरीत नसल्याचे दिसून येत आहे. थकीत वीजबिलांचा भरणा वेळेत न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीस विभागाचे सहकार्य व संरक्षण घेण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये व्यवस्थापन संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्यात आला आहे. वीजग्राहकांनी देखील थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी : संधी मुळीच दडवू नका ; थेट इंटरव्ह्यू सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कोरोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन विषाणू…’-अमृता फडणवीस यांचे ट्विट

October 25, 2020

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026

धरणगावात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ !

December 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group