भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनी भागातील (जुना) पिंपळाचे जिंवत झाड कापण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती विचारणा केली असता एका राजकीय नेत्याने बाजी मारण्याचा प्रयत्न केला. तसेच (जुना) पिंपळाचे जिंवत झाड कापण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची सुद्धा परवानगी आहे, असे सांगून जिंवत झाड कापण्यात आले.
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी भागातील किरण शंकरलाल नारा यांनी (जुना) पिंपळाचे झाड तोडण्यासाठी दि. ८ जुलै २०१९ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना अर्ज दिल्याबाबतची माहिती मालक किरण शंकरलाल नारा यांनी दिल्यावरून दि. १० एप्रिल २०२१ रोजी ठेकेदार सलिम याने आज रोजी पिंपळाचे जिंवत झाड कापण्याचा प्रकार समोर आला असून याबाबत माहिती विचारणा केली असता मालकाने माझ्याकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासनांची परवानगी असल्याचे सांगून भुसावळतील माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांना पत्रकारांशी मोबाईल वरून बोलणे करून दिले असता” तुमच्याकडून जे होईल ते करा जे छापायचे आहे ते छापा”असे बोलून राजकीय नेता बाजी मारण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्त असे की, दि. ८ जुलै २०१९ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे शिंधी कॉलनी भागातील किरण शंकरलाल नारा यांनी सिटी सर्व्हे नंबर ३२६४ मधील म्यु घर २३ पी ४५९७ (जुना) पिंपळाच जिंवत झाड तोडण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती घटनास्थळी पत्रकार गेले असता मालकाने व ठेकेदाराने दिली. तसेच नगरपरिषदेचे लेटर हेडवर परवानगी देण्यात आल्याचे मालकाने पत्रकारांना पत्र दाखविले. त्या पत्रावर नगरपरिषदेचे शिक्का व संबंधित अधिकाऱ्यांची सही दिसत नव्हती. कदाचित प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी ते पत्र तयार करण्यात आले नसावे. मालक व ठेकेदार यांचे म्हणणे होते की, आमच्याकडे पोलिसांचे सुद्धा परवानगी आहे. तसेच (जुना) पिंपळाचे जिंवत झाड कापण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची सुद्धा परवानगी आहे, असे सांगून जिंवत झाड कापण्यात आले.
मुख्याधिकारी तपास करणार
भुसावळ नगरपरिषदेचे संदीप चिंद्रवार यांच्याशी संपर्क साधला असता जामनेर रोड वरील सिटी सर्व्हे नंबर ३२६४ मधील म्यु घर २३ पी ४५९७ (जुना) पिंपळाच जिंवत झाड तोडण्यासाठी अर्ज दिला आहे की नाही याचा तपास करणार असल्याचे सांगितले. तसेच कार्यालयाला सुटी असल्याने सोमवारी तपास करून सांगेल अशी माहिती दिली.
पोलिस स्टेशनची परवानगी
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे कुठलीही परवानगी घेण्यासाठी कुठलाही व्यक्ती आलेला नाही व आमच्या कार्यालयाकडून कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण त्या प्रभागातील वीज पुरवठा चार तास खंडित करण्यात आल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. मालक व ठेकेदाराने झाड कापत असतांना वीज पुरवठा खंडित करण्याची परवानगी घेतली का? याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे .
वनविभाग कार्यालयाशी संपर्क
भुसावळ शहरातील यावल नका विभागातील माळी यांच्याशी संपर्क साधला असता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आमच्या कार्यालयाकडे गुन्हा दाखल करण्यासाठी रीतसर पत्र द्यावे, मी कारवाई करेल.