जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्ती जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२१- २२ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षांचे व नूतनीकरणाचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. सन २०२०- २०२१ या शैक्षणिक वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज भरलेले आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे लागॅइन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुध्दा महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज Re-apply करण्याची अंतिम सुविधा ३१ जानेवारी २०२२ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावेत. सर्व महाविद्यालयांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.